केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘कर्मदीप २०२६’ रोजगार संधी चे आयोजन

---Advertisement---

 

जळगाव येथे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या स्वायत्त महाविद्यालयात १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी ‘कर्मदीप २०२६’ या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून रोटरी मीन्स बिझनेस क्लब, जळगाव तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.

या रोजगार मेळाव्यात जळगावसह नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील १५ पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. सुमारे १००० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याने विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. एसएससी पासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसह आयटीआय, डिप्लोमा, व्होकेशनल कोर्सेस आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उमेदवारही या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/pX56y4s1HXsVPVh26 दिलेल्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---