---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवापूर येथील स्थानिक नागरिकांकडून प्राथमिक माहितीनुसार, हा बिबट्या रात्रीच्या सुमारास विहिरीत पडला असावा अशी शक्यता आहे. सध्या तो विहिरीतील पाईपला धरून स्वतःचा जीव वाचवत पाण्यात तरंगत असल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विहिरीत दोराला खाट बांधून सोडण्यात आली असून त्याद्वारे बिबट्याला वर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शिवापूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---Advertisement---









