---Advertisement---
TCS Nashik Case : टीसीएसमधील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात तेथील कर्मचारी निदा खानचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, तिची भूमिका कंपनीच्या नाशिक युनिटमध्ये घडलेल्या सक्तीच्या धर्मांतराशी संबंधित आहे. ती सध्या फरार असून पोलिस तिच्या मागावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत झालेला लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीमध्ये स्थानिक सदस्यांचा समावेश असावा. त्यांनी केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सवर अवलंबून न राहता वारंवार प्रत्यक्ष भेटून चर्चा करायला हवी. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या नऊ एफआयआरपैकी एकात निदा खानचे नाव इतर चार जणांसह आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
सत्र न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन
हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फरार असलेल्या निदा खानला सोमवारी सत्र न्यायालयाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळवण्यात अपयश आले. न्यायालयाने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २७ एप्रिलला निश्चित केली आहे.









