धारदार शस्त्राने वार करत चालकाला लुटले

---Advertisement---

 

जळगाव : धारदार शस्त्राने वार करत ट्रक चालकाला लुटल्याची घटना शनिवारी भरदिवसा शहरात घडली. शंकर कारभारी मगर (वय ४२, रा., अहिल्यानगर) असे जखमी चालकाचे नाव असुन त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार शंकर मगर हे चालक आहेत. ते ट्रक घेऊन एमआयडीसीत आले होते. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या जवळ दोन ते तीन अनोळखी आले. चालकाला मारहाण करत धाकात घेतले. त्यानंतर चालकाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केला. त्याच्या खिशातील १३ हजाराची रोकड जबरीने हिसकावून पसार झाले. काही प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रिक्षात टाकुन चालकाला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले. दरम्यान प्रकार कळताच पोलिसांनी या घटना नेमकी घडली कुठे, याअनुषंगाने तपास कामाला गती दिली. जखमीच्या जबाबानंतर या घटनेचा उलगडा होऊ शकले, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान एका रिक्षा चालकाने जखमीचा मोबाईलवरुन त्याच्या कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. कुटुंबातील सदस्य रविवारी सकाळपर्यंत जळगाव येथे पोहोचतील, असे कळते. शहरात भरदिवसाच्या या घटनेने कुटुंबातील सदस्य अवाक झाले. तसेच चालकाच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---