भाजपा उमेदवाराच्या घरावर गोळीबार, सीआयएसएफ जवान जखमी

---Advertisement---

 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवाराच्या घराबाहेर गोळीबार झाला. या घटनेत घराबाहेर तैनात असलेला एक सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) जवान जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन, निवडणूक आयोगाने राज्यात दोन लाखांहून अधिक केंद्रीय दल तैनात केले. असे असूनही, समाजकंटकाकडून हल्ल्याचे सत्र सुरू आहे. अशातच रविवारी रात्री उशिरा, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा मतदारसंघातील भाजपा उमेदवार पवन सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची यात घटना घडली, सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळीबाराच्या घटनेत योगेश शर्मा हा सीआयएसफचा जवान जखमी झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

निवडणूक आयोगाने अहवाल मागवला

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळी कोणी झाडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविवारी संध्याकाळी जगद्दल परिसरात पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावत असताना तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर कथित हल्ला झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. अनेक नेते तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात गेले. त्यानंतर लगेचच दोन्ही पक्षांचे समर्थक तिथे जमले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---