नाकाबंदी हटल्याशिवाय चर्चा नाही, इराणचा अमेरिकेला प्रस्ताव, अण्वस्त्रावर वाटाघाटी करण्यास तयार

---Advertisement---

 

तेहरान : मध्यपूर्वेतील सध्याचा तणाव आणि रखडलेल्या शांतता चर्चेच्या पृष्ठभूमीवर इराणने अमेरिकेला एक नवीन शांतता प्रस्ताव पाठविला आहे. पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत सादर केलेल्या प्रस्तावात, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकाबंदी हटविण्याची अट ठेवली आहे.

अण्वस्त्र मुद्यावर वाटाघाटी करण्याची तयारी त्यांनी नवीन प्रस्तावातून दर्शविली आहे. इराणच्या प्रस्तावित दोन टप्प्यांच्या योजनेत, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यावर आणि नंतर अमेरिकेने घातलेली नाकाबंदी उठवण्याची मागणी करण्यात आली. दोन मागण्या मान्य झाल्यावरच कायमस्वरूपी शांतता करारावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रस्ताव पाकिस्तान आणि ओमानमार्फत अमेरिकेपर्यंत पाठविण्यात आला आहे. अमेरिकेने दोन अटी मान्य केल्यास अणुकार्यक्रमावर औपचारिक वाटाघाटी सुरू होतील, असेही त्यात नमूद आहे.

दुसरीकडे अमेरिकेने इराणवर कठोर अटी लादल्या आहेत, त्यात किमान १० वर्षांसाठी युरेनियम संवर्धन थांबविणे, देशातून सध्याचे आण्विक साहित्य बाहेर पाठविणे आणि प्रादेशिक गटांना व त्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला दिलेला पाठिंबा संपविणे यांचा समावेश आहे. इराणवर दबावाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत अमेरिका इराणला घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु ही युक्ती इराणसमोर चालणार नाही. इराणसंदर्भातील भूमिकेत बदल केल्यानंतरच शांतता चर्चा शक्य होऊ शकते, असा इशारा अराघची यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---