जळगाव सुवर्णनगरीत सोनं-चांदी पुन्हा घसरलं; जाणून घ्या आजचे दर?

---Advertisement---

 

जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू असून जागतिक पातळीवरील युद्धजन्य तणाव हे प्रमुख कारण ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अस्थिर झाल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत, मात्र त्याच वेळी बाजारातील अनिश्चिततेमुळे दरात सतत बदल होत आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांत लक्षणीय घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत सुमारे २,८०० रुपयांची घट नोंदवली गेली असून, चांदीच्या दरात तब्बल ७,००० रुपयांनी घसरण झाली आहे. जळगावमधील सुवर्ण बाजारात सध्या सोन्याचा दर १ लाख ४८ हजार ७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे, तर जीएसटीसह हा दर १ लाख ५३ हजार १६१ रुपये इतका आहे. चांदीचा दर २ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचला असून, जीएसटी धरून तो २ लाख ४९ हजार २६० रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर दिसून येत आहे. या अस्थिरतेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार होत असून, सध्याची घसरण त्याचाच परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, लग्नसराईच्या काळात दर कमी झाल्याने ग्राहकांसाठी ही काहीशी दिलासादायक बाब ठरत आहे. खरेदीसाठी योग्य वेळ असल्याचे अनेकांचे मत असून, बाजारात यामुळे पुढील काही दिवसांतही दरात अशीच अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---