8 तासांपेक्षा जास्त काम केल्यास डबल पगार; कामाच्या तासाचा नियम बदलला, नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा….!

---Advertisement---

 

देशातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे नवे नियम लागू करण्यात आले असून 1 एप्रिलपासून नवीन कामगार कायदे देशभरात अमलात आले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत आणि ओव्हरटाईमच्या मोबदल्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, दिवसाला 8 तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम केल्यास त्या अतिरिक्त वेळेला ओव्हरटाईम मानले जाईल. विशेष म्हणजे, या ओव्हरटाईमसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित पगाराच्या दुप्पट दराने मोबदला देणे नियोक्त्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय, ओव्हरटाईम करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची संमती घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांवर जबरदस्तीने अतिरिक्त काम लादले जाणार नाही आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणार आहे.

हेही वाचा, कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!

तथापि, या नियमांचा लाभ सर्वच कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय पदांवरील कर्मचाऱ्यांना या ओव्हरटाईमच्या नियमांमधून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, जर एखाद्या कर्मचाऱ्याला ओव्हरटाईमचे पैसे दिले गेले नाहीत, तर त्यांनी संबंधित नियोक्त्याशी चर्चा करून तोडगा काढावा. तरीही समस्या सुटली नाही, तर कामगार आयुक्त किंवा संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करता येऊ शकते.

एकूणच, या नवीन कामगार कायद्यामुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि कामाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार असून, कामगार हक्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---