धुळ्यातील प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव याने तापी नदीत उडी घेऊन केली आत्महत्या, धुळ्याच्या एकता नगरात हळहळ…!

---Advertisement---

 

धुळे शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव या तरुणाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकता नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय प्रसिद्ध रिलस्टार शिवम प्रमोद यादव असे मृत तरुणाचे नाव असून, तो २७ तारखेला आपली मोटरसायकल तापी नदीजवळ सोडून बेपत्ता झाला होता. यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर २९ तारखेला सकाळी सुमारे १० वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह नदीत आढळून आला.

हेही वाचा, धावत्या कारला अचानक आग, पाच जणांचा दुर्दैवी अंत

घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील लखनऊ येथे गेले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवम हा सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर सक्रिय आणि परिचित होता. एवढ्या कमी वयात त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याच्या मित्रपरिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा, ‘तुझ्या मुलीकडून शरीरसुख दे’ म्हणताच बापाचा संताप अनावर, कुऱ्हाड व रॉडने 16 वार करून पोत्यात भरून पुलावरून फेकलं….!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---