आठ मुलांच्या आई असलेल्या सासूचं जावयावर जडलं प्रेम, मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात भेटले अन् झाले फरार….

---Advertisement---

 

आठ मुलांची आई असलेल्या एका सासूचं पाच मुलांचा बाप असलेला जावयावर जीव जडला. आणि मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात ते भेटले त्यानंतर तिथून रफुचक्कर झाल्याची घटना घडली असून कुटुंबासह परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातल्या आग्रा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत आठ मुलांची आई असलेली सासू ही पाच मुलांचा बाप असलेल्या जावयासोबत फरार झाली आहे. आग्रा जिल्ह्यातल्या अछनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली असून कुटुंबासह संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका कौटुंबिक लग्नाच्या कार्यक्रमात सर्व एकत्र आलेले होते आणि त्याच ठिकाणी या प्रकरणाची सुरुवात झाली. आरोपी जावई हा त्याच्या सासरी आलेला होता, दुपारी त्याने मेहंदीची पानं तोडण्याचा बहाण्याने त्याच्या सासूला घरामागेच असलेल्या एका शेतात बोलावलं. बराच वेळ उलटल्यानंतर देखील सासू आणि जावई हे कुठे मिळून येत नव्हते आणि ते परत न आल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान काही कुटुंबीयांनी त्यांना शेतात अश्लील अवस्थेत पाहिलं. ज्यामुळे कुटुंबीयांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. आपण पकडले जाऊ या भीतीने आणि कुटुंबीयांचा गोंधळ वाढत असल्याने जावईने त्याच्या सासूला मोटरसायकलवर बसवून पळवून नेले.

आग्रा जिल्ह्यात झालेल्या या सासू आणि जावयाच्या प्रेम प्रकरणाच्या घटनेने दोन्हीही कुटुंबांना चांगलाच धक्का बसला आहे. सासूच्या कुटुंबाला या कृत्यामुळे मोठा धक्का बसला असून तशीच परिस्थिती ही पाच मुलांच्या बाप असलेला जावईच्या पत्नीची ही झाली आहे. या गावात अनैतिक संबंध बाबत वेगवेगळ्या चर्चा ह्या रंगू लागले आहेत. यामुळे दोन्ही कुटुंबांची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली आहे.

घटना घडल्यानंतर महिलेच्या पतीने या प्रकरणात पोलीस ठाण्यात त्याच्या जावयाविरुद्ध लेखी तक्रार दाखल केलेली आहे. आणि याच जावईने त्याच्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून सासू आणि जावयाचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---