---Advertisement---
मॉस्को : रशिया एसयू-५७ लढाऊ विमान कार्यक्रमावर भारतासोबत काम करण्यास तयार आहे. हे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान असून, रशियाने भारताला विमानाच्या निर्मितीचे तंत्रज्ञान देण्याचा आणि उत्पादनाचा प्रस्तावही दिला असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली.
सेंट पीटर्सबर्ग येथे जागतिक वृत्तसंस्थांच्या प्रमुखांना दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी सांगितले की, रशिया सुखोई एसयू-५७ लढाऊ विमान कार्यक्रमावर भारतासोबत काम करण्यास तयार आहे. भारतासोबत तंत्रज्ञान सामायिक करण्यात रशियाला कोणतीही अडचण किंवा मर्यादा नाही. रशियाने भारताला पाचव्या पिढीतील विमानाच्या तंत्रज्ञानावर एकत्र काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
एसयू-५७ विमान हा एक संयुक्त प्रकल्प देखील असू शकतो. विमानाचे तंत्रज्ञान रशियाने विकसित केले असले तरी, ते या कार्यक्रमावर भारतासोबत सहकार्य करण्यास तयार आहे. रशियाला हवाई संरक्षण प्रणालींवरही भारतासोबत काम करायचे आहे.









