यावल पोलिसांकडून ऑल आऊट ऑपरेशन, हातभट्टी, गावठी दारू, सार्वजनिक ठिकाण दारू पिणारे, ट्रिपलसिट रोडरोमिओेंवर धडक कारवाई..

---Advertisement---

 

यावल येथील पोलीस निरीक्षक रंगनाथ धाबळे यांच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन ची विशेष मोहीम शुक्रवारी पहाटेपासून राबवण्यात आली. यामध्ये पिंप्री तापी नदीकाठी दारूच्या भट्ट्या नष्ट करण्यात आल्या तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे,दुचाकीवर ट्रिपलसिट हिंडणारे, बसस्थानका रोमिओगीरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.यात काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काहींना तंबी देेवून नोटीस देत सोडण्यात आले आहे.

यावल येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन पन्नीची व हात भट्टीची दारू हद्दपार करणे तसेच अवैद्य प्रवासी वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, बस स्थानकावरील रोड रोमीओ, ट्रिपलसिट दुचाकीवर हिंडणारे आदीं संदर्भात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे सह सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार उमेश सानप, उमेश महाजन, रोहील गणेश, किशोर परदेशी, प्रशांत पाटील, मोहन तायडे,नरेंद्र बागुले आदींच्या पथकाने ही मोहीम पार पाडली. यात प्रामुख्याने पिंप्री या गावात तापी नदीच्या काठी आकाश निवृत्ती सपकाळे रा. पिंप्री हा गावठी दारू हातभट्टी लावून गाळणी करीत होता. त्या ठिकाणी पोलिसांचे पथक दाखल झाले. तेथून पोलिसांनी तब्बल २१ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून गावठी दारूचे रसायन तेथे नष्ट करण्यात आले.

या कारवाईदरम्यान आकाश सपकाळे या तिथून फरार झाला. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उमेश सानप करीत आहे. तसेच याच पथकाने तापी नदीच्या काठी पुन्हा एका ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी देखील एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळणी करत होता. पोलिसांचे पथक पाहून तो तिथून फरार झाला. तेव्हा पोलिसांनी तेथून देखील तब्बल ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून गावठी दारूची रसायन नष्ट केले. हि मोहिम रात्री उशीरा पर्यंत सुरू होती.

पोलिसांच्या वतीने ऑपरेशन ऑल आउट च्या माध्यमातून ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, अवैध वाहतूक करणे, त्यासह बस स्थानकावर टवाळकी करणाऱ्या रोड रोमियोंना देखील ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली.या कारवाईत काही जणांवर दंडात्मक कारवाई तर काही जणांना नोटीस व्दारे समज देत सोडण्यात आले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---