---Advertisement---
जागतिक तणाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरूच ठेवली आहे. ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत भारताने स्वस्त दरातील तेल खरेदीचा मार्ग कायम ठेवला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात रशियाचा मोठा फायदा झालेला दिसून येतो. भारताने रशिया कडून कच्चे तेल आयात करू नये ही भूमिका अमेरिकेने मांडली असून, मात्र भारताने याकडे दुर्लक्ष करत आयात चालू ठेऊन रशियन ऊर्जा निर्यातीचा सर्वात मोठा ग्राहक म्हणून स्थान प्राप्त केले आहे.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) नुसार, मे 2026 मध्ये भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन्सची आयात केली. या आयातीत कच्च्या तेलाचा सर्वाधिक वाटा असून, तेलजन्य उत्पादने आणि कोळशाचाही समावेश आहे.
रशियन ऊर्जा निर्यातीचा सर्वात मोठा ग्राहक चीन असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, देशाच्या ऊर्जा गरजा आणि आर्थिक हित लक्षात घेऊनच तेल खरेदीचे निर्णय घेतले जातात.
भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे. ऊर्जा, व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत असल्याचे मानले जाते.
जागतिक घडामोडींमध्ये बदल होत असतानाही भारत आपल्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत स्वतंत्र परराष्ट्र धोरण कायम ठेवत असल्याचे या घडामोडींमधून दिसून येते.









