---Advertisement---

Jalgaon News: ५ लाखांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक छळ

by team
---Advertisement---

जळगाव : महिला व मुलीना नेहमीच अन्याय व अत्याचाराला समोर जावं लागत,अश्यातच जळगाव मधून एक बातमी समोर आहे. एक विवाहितेला माहेरून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा शारीरिक छळ केला जातो आहे. कामधंदा येत नाही, असे म्हणत नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेवून आणण्याची मागणी करीत विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार, ३० रोजी गुन्हा दाखल झाला.

विवाहितेचे ४ एप्रिल २०१७ मध्ये आकाश वसाणे (रा. ममुराबाद) यांच्याशी विवाह झाला.लग्नाच्या ६ महिन्यानंतर ३० मार्च २०२३ पावेतो विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ सुरु केला. त्रास असह्य झाल्याने याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन पती आकाश वसाणे, सासु कुसूम वसाणे मोठी ननंद कविता चौधरी, यावल, ननंद पूनम सूर्यवंशी रा. होळ धांदरणे (शिंदखेडा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास हेकॉ संजय धनगर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment