---Advertisement---
जळगाव : नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत नाश्ता केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराचा झटका आल्याने शहरातील तरुण असलेले डॉ. मयूर मुरलीधर जाधव (३६) रा. वास्तूनगर वाघनगर जळगाव यांचा मृत्यू झाला. बुधवार १७ रोजी ही घटना घडली. डॉ. मयूर जाधव हे चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदी कार्यरत होते. स्वस्थवृत्त विभाग प्रमुख म्हणूनही ते कामकाज पाहत होते. सकाळी आई वडील तसेच त्यांच्यापत्नीसह वास्तूनगरात वास्तव्यास होते. आज कुटुंबासोबत त्यांनी नाश्ता केला.
त्यानंतर त्यांना अचानक असह्य त्रास होवून तिव्र वेदनांनी ते घरात कोसळले. कुटुंबियांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीत वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी डॉ. जाधव यांना मृत घोषीत केले. ही वार्ता कानी पडताच जाधव कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसून ते शोकमग्न झाले. चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयातील अधिकारी, – प्राध्यापक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे स्नेहीजणांनी रुग्णालयात धाव घेत हळहळ व्यक्त केली. डॉ. मयुर जाधव यांचा अवघ्या दहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करत आहेत.
---Advertisement---