---Advertisement---

Jalgaon News : चोरीच्या पाच दुचाकींसह चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

जळगाव :  सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास असलेल्या तरुणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनीय माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित चोरीच्या ५ दुचाकीसह दोंडाईचा (जि.धुळे) येथील फैय्याज शकुर मनीयार (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) याला शुक्रवार २ रोजी ताब्यात घेतले.गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संशयित येथील सुप्रिम कॉलनीत वास्तव्य करीत होता. हा तरुण काही कामधंदा करीत नाही.

त्याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असल्याची गोपनीय माहिती पो.नि.जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसीचे गुन्हे पथक नियुक्त केले. गेल्या आठ दिवसांपासून हे पथक तपासचक फिरवित होते. संशयित सुप्रिम कॉलनीत असल्याची गोपनीय माहितीवरुन पथक सुप्रिम कॉलनीत धडकले. त्यानंतर शोध घेत फैय्याज प्रो. मनीयार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या हजार तब्बल पाच दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या.

हजार हौ कारवाई उपविभागीय पोलीस या अधिकारी संदीप गावीत पो.नि. जयपाल हिरे, पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पोउपनि दीपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पो.ना. किशोर पाटील, योगेश बारी, असा आहे मुद्देमाल २५ हजार किंमतीची पॅशन प्रो क्रमांक एमएच १९ सीबी ४०२९, २५ हजार किंमतीची होंडा अॅक्टीवा, २० हजार किंमतीची फॅशन क्रमांक एम.एच.१८ टी ९६०२, ४० हजार किंमतीची ग्लॅमर, २५ किंमतीची सुपर स्प्लेंडर विना क्रमांक असा सुमारे १ लाख ३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. यातील दोन दुचाकी एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन एक दुचाकी दोंडाईचा येथील आहे.विकास सातदीवे, सचिन पाटील, पो.कॉ. नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, महिला अंमलदार राजश्री बाविस्कर यांनी केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment