---Advertisement---

Jalgaon Crime : वृध्द महिलेला बेदम मारहाण, दिली जीवेठार मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव:  पिंप्राळा येथील हुडको येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय वृध्द महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात आशा रतनलाला जैन वय ६४ या वृध्द महिला आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता कोणतेही कारण नसतांना याच परिसरात राहणारे फरीद खाटीक, शाहीस्ता फरीद खाटीक आणि उज्ज्वला (पुर्ण नाव माहित नाही) या तिघांनी वृध्द महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार घडल्यानंतर दुपारी २ वाजता वृध्द महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार फरीद खाटीक, शाहीस्ता फरीद खाटीक आणि उज्ज्वला जळगाव या तिघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरूडे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment