---Advertisement---

मोबाईल हातातून घेतल्याचा राग; मुलगा पडला घराबाहेर

by team
---Advertisement---

जळगाव :  रात्री उशिरापर्यत मोबाईल पाहत असलेल्या १७ वर्षीय नातवाच्या हातातून मोबाईल आजीने घेत बंद केला. त्याला झोपण्यास सांगितले. याचा राग आल्याने मुलाने कामावर जात असल्याचे सांगत घर सोडले. बुधवार, २७ रोजी सकाळी ९.३० वाजता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला. मुलाचे आजोबा फुले मार्केटमध्ये दुकानात गेले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता या मुलाने दुकानावर वि जात असल्याचे सांगत घर सोडले.

मात्र तो दुकानावर पोहोचला नाही वा घरीही परतला नाही. यामुळे शे कुटुंबातील सदस्य काळजीने त्याचा परिसरात व शहरात शोध घेतला. नातेवाईकांकडे तपास केला. मात्र त्याचा शोध लागला नाही. याप्रकरणी तक्रार दिल्यावरुन रागाच्या भरात घर सोडले किवा मुलाचे कोणीतरी अपहरण केले, अशा आशयाची मिसिंग शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment