---Advertisement---

Jalgaon News: खिडकीतून केली तृतीयपंथीच्या घरात एन्ट्री, सव्वा लाखाचा मुद्देमाल घेवून चोरटे पसार

by team
---Advertisement---

जळगाव :  बंद घेर हेरत चोरट्याने बाथरुमच्या खिडकीमधून तृतीयपंथीच्या घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडत दागदागिने तसेच रोकड असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल घेत पसार झाला. सोमवार, १ रोजी ही घटना शहरातील प्रजापतनगर सातखोल्या वृंदावन कॉलनीत घडली.पूनम रेशमा जान या आईसह वृंदावन कॉलनीत वास्तव्यास आहेत. कामानिमित्त सोमवार, १ रोजी ११ वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. मंगळवारी त्यांच्या आई घरी आल्या असता दरवाजाचे लॉक उघडत्यानंतर चोरीचा मामला उघडकीस आला. चोरट्यानी खिडकीतून बाथरुममध्ये उडी मारुत आत प्रवेश केला. त्यानंतर बाथरुमचा दरवाजा तोडत बेडरुमचा दरवाजा उघडला.

कपाटाचे लॉक तोडत त्यातील सामान अस्ताव्यस्त केला. मुद्देमालाचा शोध घेत तो घेऊन पसार झाले. दोन तोळ्याच्या चांदीची अंगठी, १ लाख १५ हजाराची रोकड, ११ हजार ५०० रुपयांचा चटई बाटा, अजमेरचे १४ हजार, घर खर्चाचे ८ हजार असा सुमारे १ लाख २५ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेत्याची माहिती पूनम रेशमा जान यांनी दिली. टवाळखोरांनी हे कृत्य केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार केला असत्याचेही त्यांनी सांगितले

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment