---Advertisement---
जळगाव : विहिरीचे काम करीत असताना खाली पडल्याने पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू झाला. मंगळवार, २१ रोजी दुपारी ही घटना कानळदा शेतशिवारात घडली. गोपीचंद पंढरीनाथ बाविस्कर असे मृताचे नाव आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार, गोपीचंद बाविस्कर यांच्यासह चार ते पाच जण शेतशिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीच्या कामासाठी गेले. याठिकाणी विहिरीत गोपीचंद यांनी कमरेला दोर बांधला होता.
कामादरम्यान दोर तुटला. त्यानंतर ते खाली विहिरीत कोसळले. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना तत्काळ अन्य सहकाऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली