---Advertisement---

Jalgaon Crime News : बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लंपास

by team
---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथे बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवार, 2 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैशाली मधुकर चौधरी (रा. शिक्षक कॉलनी, म्हसावद ता. जळगाव) ह्या २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत बाहेर गेल्या होत्या. त्यांचे घर बंद घर असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरटे घरातील 70 हजार रुपयांची रोकड सोन्या चांदीचे दागिने असा दोन लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता चोरीची घटना उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी 2 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment