जळगाव,रामदास माळी: ‘मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून येट आमदार व खासदारकी आणि मंत्रिपदापर्यंत जिल्ह्यातील तीन लोकप्रतिधींनी गरुडभरारी घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून आल्यानंतर १९९७-९८ मध्ये जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी विधान भवनात दाखल होत मंत्रिपदावर बाजी मारली. त्याचप्रमाणे अमळनेरचे अनिल पाटील, मुक्ताईनगरच्या रक्षा खडसे या तर सरपंचपद, जि.प. सदस्य, नंतर खासदार आणि आता केंद्रीय राज्यमंत्री पदावर विराजमान आहेत. खासदार स्मिता वाघ यांनीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बाजी मारत नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व भूषवीत सध्या खासदार म्हणून निवडून आल्या असून जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आधी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनीही २०१९ मध्ये विधान भवनात आमदार म्हणून प्रवेश केला. जिल्हा परिषदेतून राजकारणाची सुरुवात करणारी ही सर्व मंडळी मंत्रिपदावर विराजमान झाली आहे. जिल्हा परिषदेतून थेट विधान भवनात चार जणांनी प्रवेश केला आहे. त्यात तीन मंत्री, तर एक आमदार आणि एक खासदार झाले आहेत. आता ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुका आगामी काळात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद व पंचायत समितीपासून सुरू झाली आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी २००७-१२ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवीत ‘मिनी मंत्रालया’त प्रवेश केला. त्यानंतर २०१९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडणूक लढवीत ते दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून पंचायत समितीची निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. २०१९ मध्ये भाजपने तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले… आणि चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. चव्हाण हे २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर प्रथमच चाळीसगाव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आताच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीपासून मंगेश चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे राजकीय वर्चस्व या मतदारसंघात सिद्ध झाले.
रक्षा खडसे: जि. प. सदस्या ते केंद्रीय राज्यमंत्री
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीही राजकीय कारकीर्द जिल्हा
परिषदेपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१२-२०१४ या काळात रक्षा खडसे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापतिपद भूषविले. जिल्हा परिषदेनंतर त्यांनी बेट लोकसभेच्या सदस्यत्वावर तिसऱ्यांदा मोहर उमटवली आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे.
माजी जि. प. अध्यक्षा बनल्या खासदार
अमळनेर येथील रहिवासी व जळगावच्या खासदार स्मिता वाच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची घेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी तागली होती. त्या काळातील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली. त्यानंतर विधान परिषदेवर आमदार आणि आता लोकसभेत खासदार म्हणून त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी थेट संसद भवनात प्रवेश केला आहे.
गुलाबराव पाटील जि. प. सभापती ते मंत्री
१९९७-९८ मध्ये जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद भूषवित्यानंतर गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेतून विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावले होते. त्यानंतर त्यांनी एरंडोल आणि तद्नंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधान भवनात प्रवेश केला.
अनिल पाटील जि. प. सदस्य ते मंत्री
अमळनेरचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी २००७-२०१२ या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. निवडून आल्यावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय वाटचालीस सुरुवात केली. त्यानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत त्यांनी २०१९ मध्ये विधानसभेत प्रवेश केला २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली.