---Advertisement---

Chopda News : आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कृतज्ञता रॅली काढत मानले जनतेचे आभार 

by team
---Advertisement---

अडावद, ता. चोपडा :  चोपडा विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतदारांच्या आशीर्वादाने तब्बल ३२ हजार ३१३ मताधिक्याने त्यांनी विजयश्री खेचून आणला आहे. या अनुषंगाने जनतेचे आभार मानण्यासाठी गुरुवार दि. २८ रोजी सायंकाळी अडावद येथे कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कृतज्ञता रॅलीत महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी हार्दिक अभिनंदनाचे बॅनरही झळकविण्यात आले होते. यानंतर येथील मुख्य मार्गावरुन निघालेल्या रॅलीत प्रचंड जनसागर उसळला. अभिवादन करीत गल्लोगल्ली फिरुन प्रा. सोनवणे यांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी ठिकठिकाणी पुष्पहार, शाल श्रीफळ देवून नागरिकांनी आमदारांचे स्वागत करुन मंत्रीपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या. जन आशीर्वादाचा आदर राखून अविरत विकासकामे करीत दिलेल्या संधीचे सोने करुन मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही प्रा. सोनवणे यांनी दुर्गादेवी चौकात झालेल्या समारोपाच्या वेळी दिली.

याप्रसंगी लोकेश काबरा, बाळाभाऊ सोनवणे, एम. के. शेटे, सुरेश बारी, भूषण पंचोली, नामदेव पाटील, नरेंद्र पाटील, हरिष पाटील, राजेंद्र पाटील, सचिन महाजन, रुपेश माळी, कृष्णा महाजन, प्रभाकर महाजन, संतोष सोळंके, मंगल इंगळे, सुरेश बाहेती, शशिकांत कानडे, बापू कोळी, धोंडू कोळी, विजय कोळी, सोपान कोळी, पप्पू चौधरी, पिंटू भोई, जावेद खान, कालू मिस्तरी, सद्दाम पिंजारी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment