---Advertisement---

Allocating Portfolios: महायुती सरकारचं खाते वाटप कधी ? मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं

by team
---Advertisement---

Allocating Portfolios जळगाव : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता, मात्र हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी, 39 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देखील खातेवाटप न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, खातेवाटप लवकरच होईल. त्यांनी स्पष्ट केलं की, “खातं मिळणार आहे, मात्र शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिपदाचं काम सुरू झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल. खाते वाटपात विलंब झालेला नाही, पण काही खात्यांबद्दल तिघांमध्ये वाद आहे. ते तिघे एकत्र बसून चर्चा करतील, त्यानंतर खातेवाटप होईल.”

पाटील यांचे म्हणणे आहे की, “कुठलंही खातं मिळालं तरी शेवटी खातं हे खात असतं. कॅबिनेट मंत्री होणं एवढं सोपं नाही, आणि दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री होणं ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.”

त्यांनी याबाबत अधिक सांगितले की, “माझ्या मंत्रिपदाच्या वाट्याला आलेल्या संधीचा मी योग्य उपयोग करू. पालकमंत्री किंवा इतर कोणतेही खातं मी डिमांड केलेले नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.”

याशिवाय, बीडमध्ये घडलेल्या सरपंचाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणावरही गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ती घटना निषेधार्ह ठरवली आणि यावर चौकशी करण्यात येईल, असं सांगितलं.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment