---Advertisement---

Oscars 2025: सूर्या-बॉबी देओलच्या ‘कांगुवा’सह ‘हे’ भारतीय चित्रपटही स्पर्धेत

by team
---Advertisement---

Oscars 2025:  जागतिक स्तरावर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा संगमचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांगुवा हा चित्रपट होय. हा चित्रपट 2024 साली प्रदर्शित झाला होता, आणि आता त्याने 2025 च्या ऑस्कर स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळविण्याची कामगिरी पार पडली आहे.

ऑस्कर 2025 साठी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने 207 फीचर फिल्म्सची यादी जाहीर केली आहे. यात अनेक भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही उल्लेखनीय चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.

#image_title

कांगुवा – सूर्य आणि बॉबी देओलचा हा चित्रपट चर्चेत आहे.
अदुजीविठम (गोट लाइफ)- पृथ्वीराज सुकुमारन यांचा हा चित्रपट जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा मांडतो.
मंकी मॅन – देव पटेलचा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजत आहे.
संतोष – शहाना गोस्वामीचा चित्रपट संवेदनशील कथनामुळे चर्चेत आहे.
स्वतंत्र वीर सावरकर – रणदीप हुड्डाच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवलेला चित्रपट.
ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट – याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
गर्ल्स विल बी गर्ल्स- अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांच्या प्रोडक्शन डेब्यूमुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.

सूर्या आणि बॉबी देओल चित्रपट कांगुवाची कथा साहस आणि काल्पनिक जगावर आधारित आहे. सूर्याने 2 वर्षांच्या ब्रेकनंतर केलेल्या पुनरागमनामुळे ही विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपटाची हिंदी डबिंग आणि बीजीएमवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, ज्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. तरीही, ऑस्कर यादीत त्याचे समावेश होणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे.

आगामी वेळापत्रक

ऑस्करकरिता ८ जानेवारी रोजी नामांकनासाठी मतदानाला प्रारंभ होईल. हे मतदान १२ जानेवारी रोजी समाप्त होईल. तसेच १७ जानेवारी अंतिम नामांकनांची घोषणा केली जाईल. तर  २ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

यावेळी स्पर्धा खूप कठीण  असल्याने कोणते भारतीय चित्रपट अंतिम यादीत स्थान मिळवतील हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment