---Advertisement---

Crime News: बनावट महिला उभी करून बोगस दस्तऐवज तयार करणाऱ्या आरोपींकडून रोकड जप्त

by team
---Advertisement---

जळगाव :  जिल्ह्यातील पाचोरा शहरात दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस महिला उभी करून दस्त करण्यात आला.
बनावट दस्तऐवजांचा वापर करत प्लॉटच्या खरेदी खत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यात आरोपीकडून पाच लाख रुपयांची रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. यासह लॉपटॉप, प्रिंटर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  यात बनावट आधारकार्ड तयार करणारा मनोज बन्सीलाल बेडवाल (३२) रा. जारगाव याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, संतोष भिला सोनवणे (३७, नांद्रा, ता. पाचोरा) याने एका महिलेचे बोगस आधार कार्ड बनवून आणि तिला पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून, शीतल सुशीलकुमार पाटील यांच्या मालकीच्या प्लॉटची विक्री केली होती. हि बाब लक्षात येताच दुय्यम निबंधकांनी गन्हा दाखल केला होता  यातील प्लॉटच्या मोबदला रकमेपैकी ५ लाख रुपये रोकड आरोपींकडून हस्तगत करण्यात आली. तसेच बनावट आधारकार्ड तयार करणारा सीएससी सेंटर जारगावचा मनोज बन्सीलाल बेडवाल (३२, रा. जारगाव) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर जप्त केले आहे.

त्याने यातील महिलेचे बोगस आधारकार्ड तयार करून दिले होते. त्या बोगस आधार कार्ड वरुन महिलेने दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखतचे दस्तावेज नोंदवले. दरम्यान, ती बनावट महिला जळगाव येथील आहे. याबाबत आरोपीने तशी कबुली दिली आहे.  लवकरच त्या महिलेला शोध घेऊन तिला अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी सांगितले.

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment