नाशिक: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कधी होईल, हे ‘देवा’लाच माहित असल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. शनिवार (दि. २५) रोजी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात शासकीय पूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
महाजन म्हणाले, “आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच चर्चेतून सुटेल.” यंदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय प्रलंबित असल्याने महाजन यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. त्यांनी यापूर्वी चौथ्यांदा त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!
छगन भुजबळ आणि अमित शाह भेट चर्चेत
नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मालेगाव येथील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या संदर्भात महाजन यांनी स्पष्ट केले की, “हा कार्यक्रम भाजपचा नव्हता. अमित शाह हे सगळ्यांना समान वागणूक देतात. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे शाह यांनी त्यांना योग्य मान दिला. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत काही निर्णय असल्यास वरिष्ठ नेत्यांना माहिती असेल.”
महाजन यांच्या या वक्तव्यांमुळे पालकमंत्रीपदाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे, तसेच नाशिक आणि रायगड जिल्ह्यांसाठी अंतिम निर्णय कधी होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.