---Advertisement---

धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला

---Advertisement---

गांधीनगर ।  गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात दोन सख्ख्या भावांनी आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगरमधील मोखासन गावात राहणाऱ्या संजय आणि जयेश ठाकूर या दोन सख्ख्या भावांच्या आईचे गावातीलच रतनजी ठाकूर यांच्यासोबत गेल्या १५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ही बाब मुलांना मान्य नव्हती. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि आईच्या या नात्यामुळे वडिलांच्या स्मृतीचा अपमान होत असल्याची त्यांची भावना होती. आईला अनेकदा समजावूनही तिचे रतनजी ठाकूर यांच्यासोबतचे संबंध सुरूच होते.

हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून जन्मलेले अपत्य कोणाचे? सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

या नात्यावरून वारंवार घरगुती वाद होत होते. गावातील जातपंचायतीकडेही हा वाद गेला. जातपंचायतीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे संजय आणि जयेश यांचा संताप वाढत गेला.

हेही वाचा : हृदयद्रावक ! रेल्वे रुळ ओलांडण विद्यार्थिनीला पडलं महागात; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रतनजी ठाकूर हे गावात घरबांधणीच्या कामात व्यस्त होते. त्याच वेळी, संजय आणि जयेश तिथे पोहोचले. त्यांच्या हातात धारदार चाकू आणि लोखंडी रॉड होते. अचानक त्यांनी रतनजी ठाकूर यांच्यावर हल्ला केला. प्रथम एका भावाने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून त्यांना खाली पाडले. नंतर दुसऱ्या भावाने चाकूने पोटात वार करायला सुरुवात केली.

दोघांनी मिळून रतनजी यांच्या पोटात चाकूने अनेक वार केले. इतक्यावरच न थांबता त्यांचे आतडे बाहेर काढून हवेत फेकले आणि शरीराचे अवयव कापून निर्घृण हत्या केली. हा सर्व प्रकार पाहून मजूरांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाहीत. हल्ला करून दोघेही भावू हवेत चाकू फेकून घटनास्थळावरून फरार झाले.

हेही वाचा : कुंभमेळ्यात चमत्कार! 27 वर्षांपूर्वी हरवलेले गंगासागर यादव अघोरी साधू म्हणून सापडले? कुटुंबीयांनी केली ‘ही’ मागणी 

पोलीस तपास आणि अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संजय आणि जयेश यांना शोधून काढले आणि ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या अमानुष हत्येने संपूर्ण गांधीनगर हादरले आहे. कुटुंबातील वादाचे पर्यवसान इतक्या क्रूर हत्येत होईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment