---Advertisement---

Jalgaon News: मित्राला फोन करून विचारले ‘तू कुठे आहेस?’ अन् तरुणाने घेतला गळफास, परिसरात खळबळ

by team
---Advertisement---

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी उघडकीस आली. ज्ञानेश्वर साळुंखे कडू (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. गळफास घेण्यापूर्वी त्याने त्याच्या मित्राला फोन केला होता.

ज्ञानेश्वर साळुंखे हा एका रुग्णालयात काम करत होता. तो आई-वडिलांसह रामेश्वर कॉलनीत राहत होता. आई आशासेविका असून, वडील हमालीचे काम करतात. बुधवारी सकाळी दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेल्याने ज्ञानेश्वर घरी एकटाच होता.

हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याने मित्र शुभम रंगारी याला फोन करून “तू कुठे आहेस?” अशी विचारणा केली. शुभम त्याच्या घरी पोहोचला असता, ज्ञानेश्वरने गळफास घेतल्याचे आढळले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जळगाव शहरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण अधिक आढळत आहे. मागील काही महिन्यांतील घटना पाहिल्यास, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह यांसारख्या कारणांमुळे अनेकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment