मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासावर विस्तृत चर्चा झाली असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या वेगवान विकासासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले. राज्यातील मोठे पायाभूत प्रकल्प, गुंतवणूक धोरण, शेती सुधारणा आणि औद्योगिक वाढ या मुद्द्यांवर चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान, प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा. स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
सरपंच हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत तर अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे हेदेखील एका जुन्या वादामुळे अडचणीत आले आहेत.
त्यामुळे राज्यातील महायुती सरकारमधील दोन्ही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. आणि त्यातच स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यामुळे महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहेत.
पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वच्छ प्रशासन करा असे आदेश दिलेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामे घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात होत आहे. राज्यातील प्रशासन स्वच्छ असावे, त्यात कुणाचीही पर्वा करू नका, असे आदेश देणार पत्र पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आता यामुळे मुंडे आणि कोकाटे यांचे राजीनामे होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.