---Advertisement---

आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…

by team
---Advertisement---

नागपूर : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ‘नमो किसान सन्मान निधी योजने’त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ६ हजार रुपयांच्या निधीत ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आता शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ९ हजार आणि केंद्र सरकारकडून ६ हजार असे मिळून वर्षाला एकूण १५ हजार रुपये मिळणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता वाटप
केंद्र सरकारतर्फे भागलपूर, बिहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. याचाच राज्यस्तरीय कार्यक्रम वनामती, नागपूर येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षता केली.

कृषिमंत्री अनुपस्थित राहिल्याने चर्चा
या महत्त्वाच्या कार्यक्रमात कृषी विभागाशी संबंधित असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अधिक मदतीचे आश्वासन
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना ६ हजार रुपये सन्मान निधी देते. राज्य सरकारही ‘नमो किसान सन्मान निधी’द्वारे आधीच ६ हजार रुपये देत होते. मात्र, आता त्यामध्ये ३ हजार रुपयांची वाढ करून एकूण मदत ९ हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये मिळतील.”

हा निर्णय लवकरच अंमलात आणला जाणार असून, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment