नाशकातील गंगापूररोडवरील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे गैरप्रकार सुरु असलेल्या माहितीच्या आधारावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी एका कॅफेत स्वतः छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नाशिक मधील गंगापूररोडवरील ‘अ’मोगली कॅफेत गैरप्रकार सुरु असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: त्या ठिकाणी जावून छापा टाकाला. त्यावेळी तरुण मुला मुलींना १०० ते २०० रुपयांत रूम दिले जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. आमदार फरांदे त्या ठिकाणी पोहचल्यावर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. या कारवाईत सात ते आठ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा : धक्कादायक ! औषध सांगून विद्यार्थिनींना द्यायचा दारू अन्…, शिक्षकाचा संतापजनक प्रकार
कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला असता या ठिकाणी तरूण आणि तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी कॅफे शोधून त्यातील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई देखील केली होती. तरीदेखील अनेक कॅफेंमध्ये युवक युवतींसाठी पडदे लावून त्यांच्यासाठी खास सोय करून दिली जात असल्याचं या कारवाई दरम्यान सामोरे आले आहे.
कॅफेवर कारवाई केल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॅफे सुरू होता, तरुण- तरुणींसाठी भाड्यानं रूम दिले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर मी धाड टाकली. हे भयंकर प्रकार गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होते. नाशिकची संस्कृती बिघडवण्याचं काम सुरू आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.