गुरु हा केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसतो, तर तो शिष्याच्या जीवनाचा मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आत्मविकासाचा प्रकाशस्तंभ असतो. जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, तोच खरा गुरु. पण याच गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शाळेतील एका शिक्षकाने दोन ९ वर्षांच्या विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औषधाच्या बहाण्याने विद्यार्थिनींना दारू पाजून आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा. हे अमानुष कृत्य शिक्षकाने एकदा नाही तर अनेक वेळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.
महेंद्र कबाथिया असं त्या नराधमाच नाव आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींना खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली दारू पाजत असे. हे अमानुष कृत्य त्याने मुलींसोबत एक नाही तर अनेक वेळा केलं. काही काळ मुलींसोबत ही घटना सुरू राहिल्यानंतर दोन मुलींपैकी एका मुलीने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल तिच्या कुटुंबाला वारंवार सांगितले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मुलीचे म्हणणे ऐकल्यानंतर एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी शिक्षक महेंद्रवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. यानंतर, एके दिवशी त्याने महेंद्रला त्याच्या मुलीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर, त्याने शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलावले. गावकरीही शाळेत जमले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही शाळेत पोहोचून महेंद्रला अटक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावातील इतर कुटुंबही संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली.
पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने घरी सांगितले की, शाळेत शिक्षक तिच्यासोबत चुकीचे कृत्य करत आहे, ज्यामुळे मुलीला खूप वाईट वाटू लागले. यासोबतच, खोकल्याच्या औषधाऐवजी दारू दिल्याची बाबही पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितली. हि धक्कादायक घटना गुजरात मधील अमरेलीतील भरतनगर येथून उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी अमरेली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.