जळगाव : शहरातील हॉटेल रामनिवास इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग विझवण्यासाठी जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आज विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (१८ मार्च) सायंकाळी ५ वाजता जळगाव शहरातील हॉटेल रामनिवास इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणावर धुर निघत होते. धुराचे रूपांतर अचानक आगीत झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती लागलीच अग्निशामक दलाल कळविण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल होत मदतकार्यात सहभागी झाले. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.
Jalgaon News : हॉटेल रामनिवासला आग; अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल
