पती-पत्नीचे नाते हे खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानले जाते विश्वासावर हे नातं टिकून असतं अशाच या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आलाय. अंगावर काटा आणणारा हा प्रकार असून या घटनेत चक्क पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सौरभ लंडनमधील एका बेकरीमध्ये काम कमला होता. तसेच मेरठ येथे त्याची पत्नी मुस्कान आणि सहा वर्षांच्या मुलजि राहत असे. महिन्यातून एकदा भारतात येत असे. सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता.
पत्नीचा वाढदिवस असल्यामुळे सौरभ हा सुटी काढून भारतात आला होता. आपल्या पत्नीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा त्याचा प्लान होता. मात्र याचदरम्यान त्याच्या पत्नीचे साहिल नावाच्या तरूणाशी संबंध असल्याचे समोर आले. मुस्कानचे साहिल शुक्लासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. अशा परिस्थितीत दोघांनीही सौरभला संपवण्याचा कट रचला.
४ मार्चच्या रात्री मुस्कानने तिच्या पतीच्या जेवणात मादक पदार्थ मिसळले, ज्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर तिने तिचा प्रियकर साहिलला घरी बोलावले. दोघांनी मिळून प्रथम सौरभच्या छातीवर चाकूने वार केले, नंतर त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी सौरभचे हात कापले आणि दुसऱ्या दिवशी जवळच्या बाजारातून एक मोठा प्लास्टिक ड्रम, सिमेंट आणि वाळू विकत घेतली. त्यांनी मृतदेह ड्रममध्ये ठेवला आणि त्यात सिमेंट आणि वाळू भरून खोलीत ठेवली. कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून हत्येनंतर आरोपी कोणतीही चिंता न करता शिमलाला गेले.
१८ मार्च २०२५ रोजी मृत सौरभचा भाऊ बबलू नावाच्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की त्याचा भाऊ ५ मार्चपासून बेपत्ता आहे. बबलूला संशय होता की त्याच्या भावाची हत्या मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केली आहे. त्यावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
१७ मार्चच्या रात्री ते परत आले तेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगवान केला होता. पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली तेव्हा दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सौरभचा मृतदेह ड्रममधून जप्त केला आणि घटनेत वापरलेले हत्यार जप्त केले.
सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यूपीतील मेरठमध्ये घडलेली ही भयानक घटना प्रेम प्रकरणांच्या आंधळ्या शर्यतीत नातेसंबंध आणि गुन्हेगारीच्या बिघाडाचे एक भयानक उदाहरण बनली आहे.