---Advertisement---

मोठी बातमी! निर्मल सिड्सच्या प्रयोगशाळांना NABLची मान्यता

---Advertisement---

पाचोरा : बी-बियाणे आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात साडेतीन दशकांपासून सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली अग्रगण्य कंपनी निर्मल सिड्सला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अचुकतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे NABL चे मानांकन प्राप्त झाले असून या माध्यमातून कंपनीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा मानाची मोहर उमटली आहे.

निर्मल सिडस्‌ कंपनी आधुनिक गुणवत्ता व सामाजिक भान यासाठी परिचित असून नवनवे शोध, आधुनिक प्रयोगांना यशस्वीपणे पूर्ण करुन शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला सातत्याने प्राधान्य देत आहे. आजवर कंपनीला अनेक पुरस्कार आणि मानांकनांनी गौरविण्यात आले असून यात NABL म्हणजेच नॅशनल ऍक्रेडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लेबोरेटरीज या मानांकनाची भर पडल्याने निर्मलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

NABL ही क्वालीटी ऑफ इंडिया अंतर्गत कार्यरत एक स्वायत्त संस्था असून ती भारतातील प्रयोगशाळा यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानांकनानुसार प्रमाणीत करते. ही मान्यता ISO/IEC 17025 या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दिली जाते, जी प्रयोगशाळेतील चाचणी प्रक्रियांच्या अचुकता, गुणवत्ता आणि जागतीक स्तरावर विश्वासार्हता दर्शवते. NABL च्या मानांकनामुळे निर्मल सिड्‌सच्या सीड टेस्टींग आणि मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळांना अधिकृतपणे वैज्ञानिक, औद्योगिक आणि सरकारी स्तरावर मान्यता मिळाली आहे.

गुणवत्तेची परंपरा आणि प्रयोगशाळांची जागतिक स्तरावर मान्यता

निर्मल सिडस्‌ने आजतागायत गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता गुणवत्ता हेच आपले प्रमुख ध्येय मानून जागतीक दर्जाच्या निकषांचे पालन केले आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच निर्मलच्या सिड टेस्टींग लेबोरेटरी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी लेबोरेटरी या दोन्ही प्रयोगशाळांना NABL चे प्रमाणपत्र मिळाले आहे.

या मानांकनामुळे निर्मल सिडस्‌च्या चाचणी प्रयोगशाळांना जागतीक स्तरावर अधिक मान्यता मिळेल. NABL प्रमाणीत प्रयोगशाळांचे चाचणी अहवाल, अचूक आणि विश्वासार्ह मानले जातात, त्यामुळे विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या स्वत:च्या चाचण्या करुन घेण्यासाठी निर्मल सिडस्‌ला प्रथम प्राधान्य देऊन नियमांचे पालन करु शकतात.

दरम्यान अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे हे मानांकन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, आमच्या कंपनीसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे की आम्हाला NABL चे प्रमाणपत्र प्राप्त झाले. ही मान्यता आमच्या प्रयोगशाळेतील चाचणी प्रक्रियांची गुणवत्ता अचुकता आणि जागतिक स्तरावरील मानकांची पुर्तता दर्शवत असल्याची त्यांनी नमुद केले. निर्मल सिडस्‌च्या गुणवत्तेवर NABL च्या मानांकनाची मोहोर ही अतिशय कौतुकास्पद मानली जात असून विविध क्षेत्रातून निर्मल सिडस्‌चे कौतुक करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment