---Advertisement---
Jalgaon : आपलं महानगर परिसरात नावाजलेलं जळगाव. जिल्ह्याचं शहर हे सांगण्याचं कारण, येथे सर्वच उच्च स्तरीय अधिकारी वास्तव्यास असतात. आमदार, खासदार, मंत्री यांची ये-जा सुरू असते. तरीही अशी कार्म होतात…? कशी? कोणाचाच धाक, दबदबा राहिलेला नाही का? महानगराचा एक भाग… छत्रपती शिवाजी नगरमधील वॉर्ड क्र. २ मधील मराठा मंगल कार्यालयासमोरील रस्त्याची ही कहाणी… या रस्त्याची केवळ एक वर्षात दुर्दशा झाली आहे. मी रस्ता बोलतोय… हे मला वारंवार सांगावं लागतंय. तीस वर्षांची दीर्घ प्रतीक्षा अनक खाचखळगे अंगावर घेत मी निपचित पडून राहिलो… कुणाला सांगू, कोण करणार होता माझा कायापालट? मलाच खात्री नव्हती. हाडामांसाची माणसं जिथं मूग गिळून बसली होती. तिथं मला काय आणि कोण विचारणार? अंगाखांद्यावरून माणसं, मुलं, महिला, म्हातारे कोतारे सारेंच धडपडत. चाचपडत वावरत होते. वाहनं जात येत होती. पण कोणालाच जणू वाचा नव्हती..
काळ धावत होता… दिवस जात होते. रस्ता तसाच होता. परिसरातील तरणी पोरं आता वयस्कर झाली होती… आणि या रस्त्याचा भाग्योदय झाला… गेल्या वर्षी म्हणजे वर्षाभरापूर्वी हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. मात्र, पावसाळा येण्याआधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता खड्क्यांचा अड्डा झाला आहे…. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता हे काहीच कळत नाही. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्टपणे करण्यात आले आहे. हे उघड आहे. यामुळे आता नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
अधिकारी वर्ग हा मक्तेदाराकडून टक्केवारी घेत असत्याचा थेट आरोप या नागरिकांनी केला आहे. या टक्केवारीच्या नादात रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे, असे रहिवासी म्हणत आहे… जवळपास तीस वर्षांनी रस्त्याची कामे या परिसरात होत असताना अधिकारी व मक्तेदाराने केलेल्या संगनमताने रस्त्याच्या गुणवतेकडे करण्यात आत्याचा गंभीर दुर्लक्ष आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
मी छत्रपती शिवाजी नगरातील वॉर्ड क्र. २ चा रहिवासी आहे. गेल्या तीस वर्षांपासून ● या वॉर्डात कोणत्याही प्रकारची विकासकामे होत नव्हती. ती आता कुठे व्हायता लागली होती परंतु, ती निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत. याबाबत छत्रपती शिवाजी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते विविध माध्यमातून आवाज उठवत आहेत. मागील सहा महिन्यांतव या रस्त्याची दुर्दशा झाली. खडी निघत आहे. वॉर्डातील लोकप्रतिनिधी आपण विकासकामे करीत असत्याचा आव आणत आहेत सोशल मीडियावर केवळ फोटो सेशन करतात. मागील दहा वर्षात वॉर्डात काय कामे झाली? कशी व किती झाली. ती कोणत्या प्रतीची झाली. हे त्यांनी स्पष्ट करावे. येथे मुख्य रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले गेलेले नाही. छत्रपती शिवाजी नगरच्या क्रांती चौकांत दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत. आमदारांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली पाहिजे.
विजय बांदल, छत्रपती शिवाजी नगर
वॉर्ड क्र. २ मध्ये मी वास्तव्याला आहे. येथे सुधारणा होत नाहीत सुधारणा झाली ● तरी ती केवळ टक्केवारीसाठी होते. हा रस्ता तयार करून वर्षपण पूर्ण झाले नाही. वर्षभरातच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्ता एवढा निकृष्ट बनविण्यात आला आहे • की, आपण हाताने रस्ता उचकटू शकतो वरख्या वर सिमेंटचे पोपडे निघतात. खाली माती आहे. या रस्त्याची पावसाळ्यात काय दुर्दशा होईल, याची कल्पनाच करवत नाही, यात केवळ शासनाचे नुकसान होणार आहे. नवीन अधिकारी येतात. आपआपली टक्केवारी ठरवलेली असल्याने रस्ता निकृष्ट बनविला तरी त्यांना काही देणे-घेणे नसते. सर्वच रहिवासी नियमित घरपट्टी, पाणीपट्टी भरतात, परंतु त्यांना चांगला रस्तादेखील मिळू शकत नाही. ही शोकांतिका कुणाची
भगवान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता









