---Advertisement---

CSK vs MI Match IPL 2025 : चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबईची रणनीती बदलण्याची शक्यता

---Advertisement---

CSK vs MI Match IPL 2025 : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात रविवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर ृचेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वाईट फॉर्म यावर्षीच्या आयपीएलमधील आपली चमक कमी करू शकतो, परंतु मुंबई इंडियन्सला आपली विजयी घोडदौडी कायम ठेवण्यासाठी रणनीती बदलण्याचे आव्हान असेल.

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादवर सलग दोन विजय मिळवून आपल्या डळमळीत मोहिमेला पुन्हा जिवंत करण्यासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु हार्दिक पांड्याच्या सातव्या स्थानावर असलेल्या संघाला अजूनही गुणतालिकेच्या मध्यस्तरातून वर जावे लागणार आहे. सध्या दहा संघांच्या आयपीएल गुणतालिकेत चेन्नई ४ गुणांसह तळाच्या स्थानावर आहे. तर मुंबई ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमच्या अवघड खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जबरदस्त योजना आखली व हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. फिरकी गोलंदाजांनी वेढलेल्या सीएसके विरुद्ध असा दृष्टिकोन योग्य ठरणार नाही व त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता आहे.

सीएसकेच्या नूर अहमदने सात सामन्यात १२ बळी घेत चांगली कामगिरी केली आहे. यात त्याने हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तीन बळी टिपले आहे. सीएसकेकडे रविचंद्रन अश्विन (५ बळी) व रवींद्र जडेजा (४) हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. तथापि, सीएस के विरुद्धच्या चेपॉकमधील पहिल्या सामन्यात पराभव पत्करला असला तरी, मुंबई इंडियन्स सध्याच्या फॉर्ममुळे अजूनही वरचढ राहण्याची शक्यता आहे.

रोहित शमनि अद्याप मोठी धावसंख्या उभारलेली नाही, परंतु हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली वेगवान सुरुवात मुंबई इंडियन्सला आवश्यक असलेली प्रेरणा मिळाली. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादवनेही चांगली कामगिरी केली आहे. रायन रिकेल्टनचे योगदान व विल जॅक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी इंधन मिळाले आहे.
ट्रेंट बोल्टने अलिकडच्या सामन्यांमध्ये यॉर्कर्सच्या अचूक कामगिरीत अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत. जसप्रीत बुमराहनेही हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीत सुधारणा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment