शहादा परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच; सोनवल येथील अंगणवाडीतून टीव्ही, बॅटरी तर लांबोळा शिवारातून ठिबकच्या नळ्या चोरीला….!

---Advertisement---

 

शहादा तालुका आणि शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी अंगणवाडी आणि शेतातून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
      
पहिली घटना सोनवल त.ह. येथे घडली. येथील अंगणवाडी केंद्राचा प्लायवूडचा दरवाजा आणि कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. अंगणवाडीतून ५ हजार रुपये किमतीची ३२ इंची स्टार अक्युरेट अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आणि ६ हजार ५०० रुपये किमतीची सोलर इन्व्हर्टर बॅटरी, असा एकूण ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी ६ ते १२ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अंगणवाडी सेविका रेखा शामराव मालुसरे (वय ४१, रा. कवळिथ, ता. शहादा) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील करीत आहेत.
      
दुसरी घटना लांबोळा शिवारात घडली. येथील शेतकरी जयदेव श्रीपत पटेल (वय ६२) यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रुपये किमतीच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे ७ बंडल (एकूण ३५०० मीटर लांबी) फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. ही चोरी १३ मे रोजी सायंकाळी ६ ते १४ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान झाली. याप्रकरणी जयदेव पटेल यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मेहेरसिंग वळवी करीत आहेत.
    
शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---