---Advertisement---

Gold Rate : सोनं झालं स्वस्त, खरेदी करण्याची हीच संधी, जाणून घ्या ताजे दर

---Advertisement---

जळगाव : सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. पण, आता लाखाच्या पुढे गेलेले सोने घसरताना दिसत आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयच्या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

जळगावच्या सुवर्णपेठेत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. गेल्या आठवड्यात २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी ९९००० रुपयावर तर जीएसटीसह १ लाखाच्या वर गेला होता. पण मागच्या काही दिवसात त्यात घसरण दिसून आली. दुसरीकडे चांदीचा दर ९८००० रुपये प्रति किलोवर आहे. त्यामुळे उच्चांकीपासून सोन्याचा घसरला असून यामुळे लग्नसराईत किंवा अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

मौल्यवान धातुबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याने ग्राहकांना व गुंतवणुकदारांना चांगला परतावा दिला होता. सराफा बाजारात तर काही ठिकाणी सोन्याची किंमत 1लाखांपार गेली होती. मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत.

जळगावच्या सुवर्णपेठेत सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९६,६०० रुपये प्रति तोळा इतका आहे. गेल्या आठवड्यात २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर विनाजीएसटी ९९००० रुपयावर तर जीएसटीसह १ लाखाच्या वर गेला होता. पण मागच्या काही दिवसात त्यात घसरण दिसून आली. दुसरीकडे चांदीचा दर ९८००० रुपये प्रति किलोवर आहे. त्यामुळे उच्चांकीपासून सोन्याचा घसरला असून यामुळे लग्नसराईत किंवा अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment