Jalgaon Bus Accident: निंभोरेहून जळगावला येणाऱ्या एसटी बसला आहुजा नगर स्टॉपजवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात बस उतरली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला. बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती. दरम्यान बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून अपघातामुळे प्रवासी व चालक-वाहक घाबरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
प्रवाशांचा थरकाप उडवणारी ही घटना होती. निंभोरेहून जळगावला येणाऱ्या एसटी बसला ट्रकने कट मारला, यामुळे एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला, जवळपास ४० ते ५० प्रवाशांनी भरलेली ही रस्त्याच्या बाजूला असेलेल्या झाडाझुडपांमध्ये अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातामुळे प्रवासी व चालक-वाहक घाबरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. चालक रमेश चौधरी आणि वाहक गोपाल सूर्यवंशी यांनी बसमधील प्रवाशांना धीर दिला.
Jalgaon Bus Accident: मोठा अनर्थ टळला! ट्रकने कट मारल्याने एसटी बस खड्ड्यात, आहुजा नगर जवळील घटना
Published On: एप्रिल 28, 2025 11:48 am

---Advertisement---
---Advertisement---