---Advertisement---

Crime News : प्रियकराकडूनच आईसमोर २ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना अटक

---Advertisement---

Crime News : मुंबईतील मालवणी परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ३० वर्षीय महिलेला आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ७०, ६४, ६५(२), ६६, १०३, २३८, ३(५) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६, १० आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला उपचारासाठी मुंबईतील मालवणी जनकल्याण नगर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. तपासणीनंतर तेथील डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. परंतु वैद्यकीय तपासणीदरम्यान असे आढळून आले की मुलीच्या गुप्तांगांवर गंभीर जखमा आहेत. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिस तपासादरम्यान, मुलीच्या आईचे १९ वर्षांच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. आरोपी महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्याचेही समोर आले. त्यावेळी ती गर्भवती होती. घटस्फोटानंतर तिने एका मुलीला जन्म दिला. या काळात तिचे आरोपी मुलाशी प्रेमसंबंध जुळले . ती तिच्या आईच्या घरी राहत होती. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, काल रात्री आरोपीने मुलीवर तिच्या आईसमोर अत्याचार केले.

पीडित मुलगी वेदनेने ओरडत राहिली, पण तिची आई तिला वाचवण्यासाठी आली नाही. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी महिलेने तिच्या मुलीला अपस्माराचा त्रास असल्याचे सांगून डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment