---Advertisement---

Jalgaon News : मनपाचे २२१ कर्मचारी कालबद्ध पदोन्नतीच्या पहिल्या लाभासाठी पात्र

by team

---Advertisement---

Jalgaon News : मनपाच्या आस्थापना विभागाकडून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान कार्यरत कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती देण्याची प्रक्रिया पुर्ण केली असून जळगाव महानगरपालिकेतील २२१ कर्मचारी कालबध्द पदोन्नतीच्या पहिल्या लाभासाठी पात्र ठरले असून २१५ कर्मचारी दुसऱ्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२२ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील माहिती आता आस्थापना विभागाने मागवली आहे.

नगरपालिकेत १९९१ ते ९७ दरम्यान, मोठ्याप्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती झाली. या कर्मचाऱ्यांना २००९ मध्ये कालबध्द पदोन्नतीचा पहिला लाभमिळयला पाहिजे होता, त्यानंतर २०१९ मध्ये दुसरा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु तत्कालिन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे कर्मचारी कालबध्द पदोन्नतीच्या लाभापासून वंचित होते. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यासाठी आस्थापना विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी प्रक्रिया सुरु केली होती.

ही प्रक्रिया पुर्ण होऊन प्रथम लाभासाठी गट क आणि गट-ड मधील २२१ कर्मचारी पात्र ठरले असून ४४८ कर्मचारी अपात्र ठरले आहेत. तसेच ३२४ कर्मचाऱ्यांनी कागदपत्र सादर न केल्यामुळे त्यांची प्रकरणे खुली ठेवण्यात आली आहेत. तर, २०१ कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी अपुर्ण असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. त्याच प्रमाणे दुसऱ्या लाभासाठी ४०५ पैकी २१५ कर्मचारी पात्र ठरले असून ४८ कर्मचारी अपात्र ठरले आहेत. तर १४२ कर्मचाऱ्यांनी कागदपत्र सादर न केल्यामुळे त्यांची प्रकरणे खुली ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात नवीन वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश समितीने आस्थापना विभागाला दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---