Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्याअंतर्गत असलेले सहा उपविभागीय दंडाधिकारी यांसह १५ तालुकास्तरीय महसूल विभाग आहेत. गेल्या तीन वर्षांचा आढावा पाहता, महसूल विभागांतर्गत ११९.०९ टक्के निधी अर्थात निर्धारित उद्दिष्टापेक्षा तब्बल २८.१७ टक्के गौण खनिज आणि जमीन महसूल रकमेची वसुली झाली आहे.
जिल्ह्यासाठी २०२३-२४ अंतर्गत ५६ कोटी जमीन महसुली उद्दिष्ट होते. त्यापैकी ४२ कोटी ६७ लाख ७२ हजारनुसार ७६.२१ टक्के महसुलाची वसुली झाली. तर गौण खनिज अंतर्गत ७२ कोटी ८२ लाख रुपये उद्दिष्ट होते. त्यानुसार उद्दिष्टशेपक्षा २.२४ टक्के म्हणजेच ७४ कोटी ४४ लाख ८२ हजार रुपयांनुसार १०२.२४ टक्के महसूल गौण खनिज विभागाला मिळाला आहे. जमीन महसूल आणि गौण खनिजनुसार १२८ कोटी ८२ लाख रुपये महसुली उद्दिष्टानुसार ११७ कोटी १२ लाख ५४ हजार म्हणजेच सरासरी ९०.९२ टक्के महसूल मिळविण्यात यश आले होते.
महसूल विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत २०२२-२३ च्या तुलनेत महसूल वसुलीत ३४.९२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. खनिज महसुलात २०२४-२५ या आर्थिक वर्षात २०२२-२३ च्या तुलनेत ४९.९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात ६४ कोटी १५ लाख उद्दिष्टापैकी ६४ कोटी २४ लाख म्हणजेच १००.१५ टक्के तर गौण खनिज विभागातून ८१ कोटी ५५ लाखांच्या उद्दिष्टापैकी तब्बल १४ टक्के जास्तीचा म्हणजेच ९३ कोटी ७८ लाख ६९ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
यात ९३ कोटी म हसूल वसुली प्रथमच १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात नवा मैलाचा दगड ठरेल, असा महसूल वसूल जमा झाला आहे. जमीन महसूल व गौण खनिजअंतर्गत १४५ कोटी ७० लाखांच्या उद्दिष्टापैकी १५८ कोटी ३ लाख ४९ हजारनुसार १०८.४९ टक्के वसुली झाली आहे. तर २०२४-२५ अंतर्गत ४२ कोटी ९० लाख ३५ हजार जमीन महसुली उद्दिष्टापैकी तब्बल ५२ कोटी ६२ लाख २९ हजार म्हणजेच १२२.६५ टक्के वसुली झाली आहे.
याशिवाय गौण खनिजअंतर्गत ९५ कोटींच्या उद्दिष्टापैकी १११ कोटी ६० लाख २२ हजार म्हणजेच उद्दिष्टाच्या ११७.४८ टक्के गौण खनिज महसूल वसुली झाली आहे. जमीन महसूल आणि गौण खनिज महसूल यांचे एकत्रित उद्दिष्ट १३७ कोटी ९० लाख ३५ हजार रुपये होते. त्यापेक्षा ११९.०९ टक्के अर्थात १६४ कोटी २२ लाख ५१ हजार रुपये महसुली उत्पन्न जिल्हा प्रशासनाला मिळाले आहे.
सातत्यपूर्ण प्रयत्न, काटेकोर नियोजनामुळे उद्दिष्ट साध्य
जिल्हा महसूल विभागाने सलग दोन आर्थिक वर्षांमध्ये (२०२३-२४ व २०२४-२५) १०० टक्क्यांपेक्षा अधिक महसूल वसुली साध्य केली आहे, यात ही बाब गौरवास्पद व प्रेरणादायक आहे. जमीन महसूल आणि गौण खनिज महसूल वसुली शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असून, या यशामागे महसूल विभागातील अधिकायाचे सातत्यपूर्ण प्रयत्न, काटेकोर नियोजन व कामाप्रति निष्ठापूर्वक सेवाभाव हे घटक आहेत.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.