---Advertisement---

केशवस्मृती प्रतिष्ठानचा जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार, गावांच्या शाश्वत विकासासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान कटिबद्ध – डॉ. भरत अमळकर

---Advertisement---

येथील केशवस्मृती प्रतिष्ठानने जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. याचा दृष्य परिणाम म्हणजे डॉ. भरत अमळकर यांनी नुकताच जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दौरा केला. या दौऱ्यात ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. भरत अमळकर म्हणाले, “गावांच्या शाश्वत विकासासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान कटिबद्ध आहे. जलसंधारण, उद्योजकता विकास, महिला सबलीकरण आणि इतर ग्रामविकास प्रकल्पांतून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा उद्देश आहे.

ग्रामस्थांचा सहभागच या प्रकल्पाचे यश सुनिश्चित करेल.” तसेच रोटरी क्लबच्या वतीनेही या उपक्रमाला पाठबळ दिले जाणार असून, ग्रामीण विकासासाठी रोटरीची भूमिका महत्त्वाची राहील, असेही डॉ. अमळकर यांनी नमूद केले. जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केशवस्मृती प्रतिष्ठानने पाच गावांमध्ये पाणलोट विकास सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनी नागन खुर्द व तिघ्रा-वडगाव या दोन गावांच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष भेट देऊन घेतला.

या दौऱ्यात केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक राहुल पवार, ‘जलनायक’ प्रकल्पप्रमुख शिवाजीराव भोईटे, अनिल भोकरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, गिरीश कुलकर्णी आणि मोहन कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. भरत अमळकर यांच्या आगम नानंतर नागनचौकी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. गावातील शेतकऱ्यांनी विहिरींची माहिती व त्यांच्यासमोर नोंद (Well Inventory) माहितीच्या सादर केली.

या आधारे जलस्रोतांचे दस्तऐवजीकरण कसे केले जाते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले. यानंतर गावातील महिलांनी PRA (Participatory Rural Appraisal) या तंत्राच्या माध्यमातून गावातील पाणीसमस्या. सध्याच्या अडचणी आणि या प्रकल्पातून अपेक्षित लाभयाविषयी माहिती दिली. महिलांनी त्यांच्या भागीदारीचा ठसा उमटवत प्रकल्पात सक्रिय सहभाग दर्शविला. यानंतर सर्व पाहुण्यांनी तिघ्रा वडगाव गावाला भेट दिली. येथे सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या प्रकल्प स्थळाला (Desiltation Site) डॉ. अमळकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या ठिकाणी पोकलेन मशीनच्या साहाय्याने जलस्रोतांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यातून पाण्याचा साठा वाढून गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार असून शेतीसिंचनावरही सकारात्मक परिणाम होणार आहे. तिघे-वडगावचे शेतकरी आणि ग्रामस्थांनीही पाहुण्यांचे स्वागत केले. प्रकल्पाच्या भविष्यातील कामांबाबत या वेळी चर्चेच्या माध्यमातून गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनीही या प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद दिला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment