---Advertisement---

Jalgaon News : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकांची धाड, ७ केंद्रांचे परवाने निलंबित

---Advertisement---

Jalgaon News : आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली असून कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणी मोहिमेत कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे. मान्सून पूर्वी करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

मान्सून सुरु होण्यापूर्वी कृषी केंद्रांमध्ये बियाणे, खते विक्रीला सुरवात करण्यात येत असते. शेतकरी वर्ग देखील शेती तयार करत पेरणीच्या कामाला लागण्याच्या तयारीत आहे. बियाणे खरेदी करण्यास देखील जणांनी सुरवात केली आहे. मात्र बऱ्याचदा बनावट बियाणे, खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.

या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. दरम्यान विविध कारणास्तव कृषी विभागाने ७ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत विविध कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात ज्यामुळे सदरील परवाना धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अर्थात मान्सूनची सुरवात होण्यापूर्वीच ही कारवाई झाली आहे.

राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरु झाली आहे. या तपासणीत अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्याने नोटीस बजावून या विक्रेत्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार अंतिम सुनावणीत ७ कृषी परवाने निलंबित केले आहेत. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाकडून तपासणी मोहीम अजून देखील सुरु आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment