---Advertisement---

वाचवा पत्नीकडून होतोय छळ; तब्बल ३३ पुरुषांनी केल्या तक्रारी

---Advertisement---

धुळे : पती व सासरच्यांकडून विवाहितेचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र धुळे जिल्ह्यात विवाहित पुरुषांचा देखील पत्नीकडून छळ होत असल्याचा प्रकार समोर आल्या आहे. आतापर्यंत तब्बल ३३ पुरुषांनी पत्नीकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, समाज काय म्हणेल, या भीतीने अनेक पुरुष पत्नीचा निमूटपणे छळ सहन करत असल्याचे पीडितांचे मत आहे.

विवाहित पती-पत्नीमध्ये अनेक कारणांवरून भांडणे होत असतात. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होते. त्यानंतर नातेवाइकांचा सहभाग यात होऊन ही प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात. यातून संसारात कलह निर्माण होऊन संसार तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांवर ‘भरोसा सेल’मध्ये सुनावणी घेऊन दोघांचीही समजूत घालण्यात येते. त्यातून संसार जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून बहुतांश संसार पुन्हा नव्याने सुरू होतात.

तर, काही प्रकरणांमध्ये तडजोड होत नाही. त्यातून पत्नी-पतीविरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करते. त्यातून न्यायालयात पोटगी ही मागितली जाते.

दरम्यान, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, यातून पती व पत्नीचा कलह वाढले आहेत. तेव्हापासून पुरुषांचा छळ होत असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये आई-वडिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. सतत भांडण करते तर काही प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंध आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.

भरोसा सेल कडून आलेल्या तक्रारीवर समुपदेशन करून पती पत्नीच्या तक्रारी सोडण्यात यश आले आहे परंतू काही तक्रारीवर मार्ग निघत नसल्याच्या तक्रारी न्यायालयात दाखल झालेल्या आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment