प्रवासात अत्यवस्थ गर्भवती महिलेचा जळगावात मृत्यू

---Advertisement---

 

पतीसोबत मूळ गावी जात असतांना रेल्वेतून प्रवासा दरम्यान गर्भवती महिलेस प्रसूतीपूर्व वेदना असह्य झाल्याने जळगाव येथे तिचा मृत्यू झाला. गुरुवारी (१४ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली. नितू चंदन सरोज (वय २७, मवैया, जि. मिर्झापूर उ.प्र.) असे मृत झालेल्या
विवाहितेचे नाव आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन सरोज तसेच त्यांच्या पत्नी नितू सरोज हे दाम्पत्य सुरत येथून ताप्ती एक्सप्रेसमध्ये एस ७ बर्थ नं. ९/१० प्रवास करत होते. ते उत्तरप्रदेशात मूळ गावी जात होते. नितू या गर्भवती होत्या. प्रवास करत असताना जळगाव जवळ त्यांना प्रसूतीकळा होऊन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.

जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर चंदन सरोज यांनी पोलिसांजवळ विषय सांगीतला. त्यानुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी धाव घेत सरोज दाम्पत्याला तत्काळ रेल्वेतून उतरवित दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय म हाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

तपासणीअंती डॉक्टरांनी नितू यांना मृत घोषीत केले. ही घटना कळाल्यानंतर चंदन निःशब्द होऊन चिंताग्रस्त झाले. पोलिसांनी त्यांना धीर दिला. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र पाटील, पीएसआय अनिंद्र नगराळे, हवालदार हेमंतकुमार नरवाडे, कॉन्स्टेबल किरण बारी यांनी याकामी तत्परतेने मदत कार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---