Indian Railway News: खंडवा विभागात रेल्वे लाईनवर डेटोनेटर भोवले ; कर्मचारी निलंबित

भुसावळ  : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोगरगाव रेल्वे लाईनदरम्यान, बुधवार, 18 रेल्वे लाईनीवर लावण्यात आलेल्या डेटोनेटर प्रकरणी संबंधीत रेल्वे कर्मचारी यांच्या निलंबन रेल्वे प्रशासनाने केले आहे. निलंबनाच्या माहितीला डीआरएम ईती पांण्डेय यांनी दुजोरा दिला.

रेल्वे कर्मचार्‍याचे निलंबन
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा सेक्शनमध्ये येत असलेल्या सागफाटा ते डोंगरगाव दरम्यान 18 रोजी दुपारी 2.30 वाजता सेना एक्स्प्रेस जात असताना रेल्वे लाईनीवर लावण्यात आलेले डेटोनेटर फुटले. यामुळे रेल्वे गाडी येथे थांबविण्यात आली होती. रेल्वे लाईनीवर डेटोनेटर फुटल्याने रेल्वे लाईनीवर घातपाताचा प्रकार झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली.

मध्य प्रदेश सरकारची आयबी यंत्रणा, एटीएस (दहशतवादी विरोधी पथक) तसेच रेल्वे सुरक्षा बल या तिन्ही यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी मोहंमद अली नामक या रेल्वे कर्मचार्‍यास अटक करण्यात आली व अटकेनंतर या कर्मचार्‍यावर रेल्वे प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.