छोटा हत्तीची दुचाकीला धडक; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । काकासोबत घरी परणार्‍या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू छोटा हत्ती वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी शिरसोली रोडवरील पेट्रोलपंपासमोर घडली. या प्रकरणी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शेख अली शेख शरीफ असे मयत चिमुकल्याचे नाव आहे तर शेख आमीन शेख आरिफ असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील फातेमा नगरात शेख शरीफ शेख आरिफ हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ शेख शेख अमीन शेख आरिफ यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली आहे. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता पुतण्या अलीला या चिमुकल्याला घेवून शिरसोली येथे सासरवाडी गेले होते. मुलीला बघितल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रस्त्यावरील एल एस पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 19 सीवाय 3290) क्रमांकाच्या छोटा हत्ती या मालवाहून वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अघातात दुचाकीवरील काका पुतणे हे रस्त्यावर पडले यामध्ये दीड वर्षाच्या अलीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शेख आमीन हे गंभीर जखमी झाले.

जखमीवर उपचार सुरु 
अपघात घडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बालकाचा मृत्यू जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी चिमुकल्याला तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. तर जखमी शेख आमीन यांच्यावर उपचार सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, वाहनचालकाला पोलिसां ताब्यता घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.